Home Breaking News पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावात भाजपा युवा मोर्चा महिला आघाडीकडून स्वच्छता...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शेगावात भाजपा युवा मोर्चा महिला आघाडीकडून स्वच्छता अभियान

26
0
शेगाव (प्रतिनिधी) : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शेगाव शहरात भाजपा युवा मोर्चा महिला आघाडी तर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच “स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून बळकटी देण्यात आली.
महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता करत नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पना आणि योजनांनी प्रेरित होऊन, त्यांच्या वाढदिवशी समाजोपयोगी कार्य घडवून आणणे हीच खरी भेट असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अनेक तरुणींनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा अनोखा संदेश या स्वच्छता अभियानातून देण्यात आला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली असून पुढील काळात असेच समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्याचे निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.