Home Breaking News चिंचवडमध्ये धक्कादायक घटना : जुन्या वादातून २५ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्दयी हत्या!

चिंचवडमध्ये धक्कादायक घटना : जुन्या वादातून २५ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्दयी हत्या!

24
0
चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहर हादरवणारी एक खळबळजनक घटना आज (दि.२२) दुपारी उघडकीस आली. चिंचवड येथील नागसेननगर झोपडपट्टीत एका २५ वर्षीय तरुणाची जुन्या भांडणाच्या रागातून निर्दयी हत्या करण्यात आली. मयत तरुणाचे नाव वैभव भागवत थोरात (२५) असे असून, या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव थोरात हा आपल्या खोलीत इतर चौघांसोबत बसलेला असताना आरोपी अचानक तेथे दाखल झाले. आरोपींमध्ये योगेश अनंत गायकवाड, अनिल आनंद बनसोडे, महेश अप्पालाल कोळी आणि एक अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे. वैभव आणि योगेश यांच्यात काही दिवसांपासून वैर सुरू होते. याच जुन्या वादातून आरोपींनी वैभववर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.
हल्ल्यात वैभवच्या हातावर, छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आले. वार इतके भीषण होते की वैभवने जागीच प्राण सोडले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. चौघांनाही ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास चिंचवड पोलिस करत आहेत. “जुन्या वादातून तरुणाचे आयुष्य संपवले जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणारच,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेमुळे नागसेननगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे गुन्हेगारीवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.