मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची चळवळ आता समाजातील प्रत्येक घराघरात आशेचा किरण घेऊन पोहोचत आहे. या लढ्यामुळे रसाळ कुटुंबातील एका मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. ही बातमी समजताच संपूर्ण गावात आनंदाची लहर पसरली असून, अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले.
रसाळ कुटुंबातील हे उदाहरण समाजाला दिशा दाखवणारे ठरणार आहे. आरक्षणामुळे आज अनेक गरजू व कष्टकरी कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. “आमच्या मुलाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, हे मनोज दादांच्या अथक संघर्षाचे फलित आहे,” असे कुटुंबाने भावनिक शब्दांत सांगितले.
याबाबत बोलताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की, हीच खरी समाजासाठीची लढाई आणि हीच खरी क्रांती आहे. मराठा समाजाच्या पुढच्या पिढ्यांना उभारी देणारी ही ऐतिहासिक चळवळ भविष्यात अनेक डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी आणि उद्योजक घडवणार आहे.
ही घटना केवळ रसाळ कुटुंबापुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील हजारो-लाखो कुटुंबांना नवी ऊर्जा देणारी आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांचे नेतृत्व हे मराठा समाजाच्या भविष्यासाठी क्रांतीची नवी दिशा ठरत आहे.