Home पुणे मराठा समाजाचा ठाम निर्धार : “आरक्षण मिळालंच पाहिजे” – राज्यभर आंदोलनांचा जोर

मराठा समाजाचा ठाम निर्धार : “आरक्षण मिळालंच पाहिजे” – राज्यभर आंदोलनांचा जोर

96
0
मराठा समाजाने पुन्हा एकदा आपला ठाम आवाज बुलंद केला आहे – “आरक्षण मिळालंच पाहिजे!” गेल्या अनेक दशकांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा सुरू आहे. अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे आणि लाखोंच्या उपस्थितीत सभा घेऊनही अजून तोडगा लागलेला नाही. समाजातील विद्यार्थी, तरुण आणि शेतकरी यांना शैक्षणिक व नोकरीच्या क्षेत्रात न्याय मिळावा यासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.
सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीला उग्र वळण लागले असून, गावोगावी “आरक्षणाशिवाय जगणार नाही” अशी हाक दिली जात आहे. अनेक गावांमध्ये आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत, तर काही ठिकाणी शांततापूर्ण रस्तारोको, ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनाला महिला आणि तरुणाईचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
राज्य सरकारवर प्रचंड दबाव वाढला असून, जर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर ही लाट आणखी तीव्र होणार असल्याचा इशाराही समाजाच्या नेत्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क आहे. गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मराठा समाजाचे म्हणणे एकच – “आम्ही हक्क मागत आहोत, दानधर्म नाही. आरक्षण हक्काचं आहे, तो आम्हाला मिळालंच पाहिजे!”
 बातमीचे ठळक मुद्दे :
मराठा समाजाचा ठाम निर्धार – आरक्षण मिळालंच पाहिजे!
राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन, मोर्चे आणि उपोषण

तरुणाई आणि महिलांचा मोठा सहभाग

सरकारवर प्रचंड दबाव, तोडगा निघण्याची गरज तातडीची
पोलीस प्रशासन सतर्क, कायदा-सुव्यवस्थेची परीक्षा