Home Breaking News पुण्यात अवघ्या २ तासांत खुनाचा छडा – कॉलरच निघाला खून करणारा; काळेपडळ...

पुण्यात अवघ्या २ तासांत खुनाचा छडा – कॉलरच निघाला खून करणारा; काळेपडळ पोलिसांची चोख तपास कार्यवाही

42
0
पुणे शहरातील काळेपडळ परिसरात घडलेली खळबळजनक घटना – एका तरुणाचा निर्घृण खून झाला असून, अवघ्या दोन तासांत काळेपडळ पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना माहिती देणारा कॉलरच या हत्येचा मुख्य सूत्रधार निघाला आहे.
घटनेचा तपशील:
दिनांक २ ऑगस्ट रोजी पहाटे ४:५२ वाजता पोलिस कंट्रोल रुमवर किसन राजमंगल सहा (वय २०, रा. बिहार) या युवकाने कॉल करून सांगितले की, त्याचा मित्र रविकुमार यादव याच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला आहे. लोखंडी पहारेने डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, रविकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तातडीने १०८ अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
तपासात मोठा ट्विस्ट:
कॉलरकडून वारंवार विचारणा केली असता, त्याच्या कथेमध्ये विसंगती जाणवू लागली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतेही अनोळखी इसम दिसून आले नाहीत. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मयत व कॉलर यांच्यात पूर्वीपासून वाद होते.
खूनाची कबुली:
पोलीस खाक्या दाखवताच किसन सहा याने कबुली दिली की, मद्यधुंद अवस्थेत रविकुमारने त्याच्याशी शिवीगाळ व मारहाण केली होती. पूर्वी झालेल्या अपमानाचा राग मनात धरून रविकुमार झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात लोखंडी पहारेने वार करून त्याचा खून केल्याचे सांगितले.
गुन्हा दाखल:
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात IPC कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत.
प्रशंसनीय पोलिस कामगिरी:
ही संपूर्ण कारवाई पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ श्री. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे व वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सपोनि विलास सुतार, सपोनि रत्नदीप गायकवाड, एपीआय अमित शेटे, पोउनि अनिल निंबाळकर, पो.अं. प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, दाऊद सय्यद, किशोर पोटे यांचा समावेश होता. म्हणून म्हणतात – गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पोलिसांच्या तपासातून सुटू शकत नाही!