पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणपूरक उपक्रम सुरू केला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश शहराचे हरित आच्छादन वाढवणे, प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे आणि नागरिकांना एक स्वच्छ व ताज्या हवेशीर पर्यावरण मिळवून देणे आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये:
देशी प्रजातींची निवड: कडुलिंब, ताम्हण, कदंब, वड, पिंपळ, आकाशनीम, बकुळ, अर्जुन, मोहगणी, सोनचाफा, पारिजात इ. झाडांची लागवड.
दर १० मीटर अंतरावर एक झाड हे धोरण राबवले जात आहे.
बांबू किंवा लोखंडी ट्री गार्ड्स झाडांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी लावण्यात येत आहेत.
देखभालीचे नियोजन: झाडे लावून सोडून न देता त्यांची वाढ, पाणीपुरवठा व देखभाल याचेही नियोजन महापालिकेने केले आहे.
३१ जुलै २०२५ पर्यंतची प्रभागनिहाय लागवड संख्या:
प्रभाग | लागवड झाडांची संख्या |
---|---|
अ प्रभाग | २०१ |
ब प्रभाग | ९१० |
क प्रभाग | २०४८ |
ड प्रभाग | ६५० |
ई प्रभाग | ७३१ |
फ प्रभाग | ४६५ |
ग प्रभाग | २३० |
ह प्रभाग | २०६ |
प्रशासनाची मते:
आयुक्त शेखर सिंह यांचे मत:
“रस्त्यांच्या दुतर्फा दर दहा मीटर अंतरावर वृक्षारोपण केल्याने आपले शहर हरित व सुंदर होणार आहे. नागरिकांनी यात सहभाग घ्यावा.”
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांचे मत:
“विकसित रस्त्यांवर झाडे लावली जात आहेत. भविष्यातील रस्त्यांवरही वृक्षारोपणाचा आराखडा तयार आहे. पर्यावरणस्नेही शहरासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.”