Home Breaking News दिव्यांगांसाठी नवी उमेद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुचाकी वाटपाचा विधायक उपक्रम

दिव्यांगांसाठी नवी उमेद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुचाकी वाटपाचा विधायक उपक्रम

9
0
अमरावती : मोर्शी येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खासदार निधीतून दिव्यांग बांधवांना विशेष प्रकारच्या दुचाकी वाहनांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणि स्वावलंबन वाढणार आहे.
या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल उंचावले. “शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट करत त्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
दुचाकी वाटपामुळे आता दिव्यांग बांधवांना शिक्षण, नोकरी किंवा वैयक्तिक कामासाठी घराबाहेर पडताना कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे. विशेष म्हणजे या दुचाकींमध्ये दिव्यांगांच्या गरजेनुसार विशेष तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
कार्यक्रमास अनेक मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, लाभार्थी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाची उपस्थितांनी व समाजातील विविध स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे दिव्यांगांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली आहे. हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्व आणि समावेशक विकासाचा एक आदर्श ठरतो.