Home Breaking News टिळेकर वाडी ग्रामपंचायतीत गिटस फुड्सच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

टिळेकर वाडी ग्रामपंचायतीत गिटस फुड्सच्या सहकार्याने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

53
0
पुणे : पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देत दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी, वार रविवार टिळेकर वाडी ग्रामपंचायत सहकार नगर ते बेंगळे वस्ती परिसरात गिटस फुड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या आणि रोहन कांबळे यांच्या सहकार्याने एक भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात हिरवाई वाढवून पुढील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
या कार्यक्रमास टिळेकर वाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गोवर्धन टिळेकर, माजी सरपंच सुभाष बापू लोणकर, माजी सरपंच गणेश टिळेकर, विद्यमान सदस्य प्रियंका ताई कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुखदेव राऊत, माजी उपसरपंच सुभाष टिळेकर, युवा रक्षक संघटना प्रमुख विनोद भाऊ बेंगळे, अंगद बेंगळे, प्रगतशील बागायतदार बंडू ताम्हणे, युवा कार्यकर्ते दयानंद कांबळे, अर्जुन बागडे, सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमास माजी उपसरपंच सुखदेव चांगदेव राऊत, प्रगतशील शेतकरी विकास राऊत, युवा कार्यकर्ते दता वीर, आरीफ सय्यद, अनिकेत बेंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांची हजेरी लागली.
कार्यक्रमादरम्यान तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राऊत  यांनी गावकऱ्यांना संदेश देताना सांगितले की, “आज लावलेले हे रोपे केवळ झाडे नसून भावी पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरातील एका तरी झाडाची जबाबदारी घेतली तर आपले गाव आणि शहर हिरवेगार होईल.”
स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनीही मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणात भाग घेतला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच पर्यावरण संवर्धनाच्या या पवित्र कार्यात सहभाग नोंदवला.
गावातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल गिटस फुड्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले. अशा उपक्रमांमुळे गावोगावी पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या वृक्षारोपण उपक्रमामुळे टिळेकर वाडी परिसरात पर्यावरण रक्षणाची नवी उर्मी निर्माण झाली आहे. सामाजिक ऐक्य आणि पर्यावरणपूरक वृत्तीचा आदर्श या कार्यक्रमातून दिसून आला.