Home Breaking News हवेली तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बापूसाहेब चौधरी यांची निवड

हवेली तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी बापूसाहेब चौधरी यांची निवड

440
0
(प्रतिनिधी श्रावणी कामत) मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या हवेली तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी मा. बापूसाहेब बबन चौधरी यांची अत्यंत बहुमानाने आणि एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड पत्रकार संघटनेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.
निवडीचे पत्र पुणे जिल्हा निरीक्षक एम.जी. शेलार, जिल्हा महिला अध्यक्षा श्रावणी कामत, जिल्हा उपाध्यक्ष रमेश निकाळजे, व हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर बोलताना बापूसाहेब चौधरी यांनी सांगितले की, “मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य अधिक व्यापकपणे राबवले जाईल. ग्रामीण भागातील पत्रकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांचे प्रश्न सोडवावे, समाजातील अन्याय, अत्याचार याविरुद्ध पत्रकारांची भुमिका ठामपणे मांडावी, यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
या प्रसंगी जिल्हा सचिव जीवन शेंडकर, तालुका सदस्य सनी फलटणकर, पत्रकार अण्णा पवार, शहाजी मिसाळ, भाऊ कुंजीर, शिवाजी मिसाळ, जाफर सय्यद, दिलीप शेवाळे, दत्ता अंबारे, रमेश गायकवाड यांसह अनेक पत्रकार उपस्थित होते.
बापूसाहेब चौधरी यांची ही निवड म्हणजे कार्यक्षम नेतृत्वाची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेत त्यांना ही जबाबदारी बहाल करण्यात आली असून त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही निवड हवेली तालुक्यातील पत्रकार संघटनेला नवे बळ देणारी ठरणार आहे. पुढील काळात पत्रकार हितासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना वेग मिळेल, अशी आशा सर्व पत्रकार बांधव व्यक्त करत आहेत.