मुंबई – काल विधीमंडळ परिसरात घडलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्ष चिघळताना दिसतोय. कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायकारक कारवायांमुळे जनमानसात संतापाचं वातावरण पसरलं आहे. याच दरम्यान आव्हाड साहेब आणि रोहितदादा या दोघांनी दाखवलेलं धैर्य आणि नेतृत्त्व कार्यकर्त्यांना मोठा आधार देत आहे.
कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तरी या नेत्यांनी थेट मैदानात उतरून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन पुकारलं. “आवाज खाली!” असं सांगत सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या या नेत्यांची उपस्थिती म्हणजेच कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे. अनेक तरुणांनी सोशल मीडियावर “लढेंगे, जितेंगे!” अशा घोषणा देत नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
ज्यावेळी सत्ता अन्याय करत असेल, त्यावेळी सत्यासाठी उभे राहणारे लोकशाहीचे लढवय्ये – रोहितदादा आणि आव्हाडसाहेब – हेच कार्यकर्त्यांच्या लढ्याचे मार्गदर्शक आहेत.
सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं की कार्यकर्त्यांवर अन्याय केल्यास हजारो हात न्यायासाठी उठतील. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व असेल, तर कुठलाही अन्याय जगजाहीर केला जाईल आणि झुंज दिली जाईल.