Home Breaking News मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी येथे...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने पिंपरी येथे रक्तदान शिबिर संपन्न In

24
0
पिंपरी, २२ जुलै २०२५:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त, आज पिंपरी येथे आमदार अमित गोरखे आणि  मा.नगरसेविका, श्रीमती अनुराधा गणपत गोरखे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पिंपरी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात २८९ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी दर्शवली.
पिंपरी विधानसभा क्षेत्रातील निगडी प्राधिकरण, शौनगर, मोहननगर, संत तुकारामनगर, दापोडी, पिंपरी गाव, मोहननगर आणि शाहूनगर या विविध ठिकाणी भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरातील भारतीय जनता पक्षाचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, विधान परिषद सदस्य उमा खापरे, कामगार नेते इरफान सय्यद, सौ. सुप्रियाताई चांदगुडे, महेश चांदगुडे, योगेश बाबर, नाना गावडे, मोरेश्वर शेडगे, अनिता वाळुंजकर, मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, राजेश पिल्ले, बापू घोलप, सदाशिव खाडे, विजय (शितल) शिंदे, घावटे सर, धरम वाघमारे, दिपक भंडारी, शाकीर शेख, आबा वाडकर, वाडकर काका, गोडसे काका, पोटे यांच्यासह जेष्ठ नागरिकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
आमदार अमित गोरखे यांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी ते म्हणाले, “राष्ट्रहितासाठी तुमच्याकडून घडत असलेली ही सेवा अत्यंत मोलाची आहे. आपल्या एक एक युनिट रक्ताने अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते.” या यशस्वी आयोजनामुळे रक्ताची वाढती गरज पूर्ण करण्यास नक्कीच मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. या स्तुत्य उपक्रमामुळे समाजात रक्तदानविषयी जनजागृती वाढण्यास मदत झाली आहे.