बीड | ४ जुलै २०२५ बीड जिल्ह्यासाठी एक आनंददायक आणि परिवर्तन घडवणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक शिक्षण, उद्योग क्षमता, डिजिटल कौशल्य आणि प्रशिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करणाऱ्या ‘सीट्रिपलआयटी’ (CIIIT – Centre for Invention, Innovation, Incubation & Training) प्रकल्पाच्या उभारणीसाठी एमआयडीसीने चार हजार चौरस मीटर जागा व निधी उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
बीड एमआयडीसी क्षेत्रात होणार प्रकल्प
▪️ ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक प्रकल्पासाठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र सुविधा क्रमांक ३ येथील जागा निवडण्यात आली आहे.
▪️ यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक यंत्रणा, स्मार्ट तंत्रज्ञान, रोबोटिक्स, ऑटोमेशन, आयटी प्रशिक्षण यामध्ये थेट प्रवेश मिळणार आहे.
तरुणांसाठी सुवर्णसंधी