ठाणे – “रस्ता अडवणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला चकनाचूर केलं पाहिजे. वार एकच असला तरी तो असा असावा की, इतिहास लिहिला जावा. पाकिस्तान केवळ पराभव मान्य करेल एवढंच नव्हे, तर तो भारतासमोर पूर्णतः मजबूर आणि निष्प्रभ झाला पाहिजे!” अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपली ठाम भूमिका मांडली.
डोंबिवली येथे झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा जागरूकता अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात तरुणांनी देशासाठी कधीही झटायचं ठरवलं पाहिजे, केवळ सोशल मीडियावर नाही, तर कृतीने देशभक्ती दिसली पाहिजे, असं ते म्हणाले.
डॉ. शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रत्येक शक्तीविरोधात भारताने न थांबता निर्णायक भूमिका घेतली पाहिजे. केवळ सीमेवर नाही तर सायबर, आर्थिक आणि मानसिक युद्धातही आपली तयारी शंभर टक्के असली पाहिजे.”
त्यांच्या या प्रभावशाली भाषणाने उपस्थित तरुणांमध्ये उत्साह संचारला. देशभक्तीने भारलेल्या या शब्दांनी ‘सर्जिकल स्ट्राइक मानसिकता’ पुन्हा एकदा जनतेच्या मनात जागवली.
उपस्थितांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत
कार्यक्रमात उपस्थितांनी या विचारांना उभं राहून प्रतिसाद दिला. “भारत एक हाथ से भी लढेल, पण जब मारेगा, तो दुनिया थरथरेल!” अशी गर्जना उपस्थित तरुणांनी केली.