पुण्यातील उच्चभ्रू रेव्ह पार्टीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर अटक करण्यात आलेल्या सात जणांपैकी एक – प्रांजल खेडवलकर यांच्याबाबत आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले की, “माझ्या जावयाला अडकवण्यासाठी दोन तरुणींना प्लँट केलं गेलं!”
पोलिस कारवाईच्या केवळ १५ मिनिटांपूर्वीच श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी या दोघांनी ईशा सिंह आणि प्राची शर्मा या दोन तरुणींना पार्टीत आणले. त्यानंतर अवघ्या काही क्षणातच पोलिसांची धाड पडते, हे इतकं ‘योगायोगाने’ कसं घडलं, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे.
पोलिसांवर नियोजित कारवाईचा संशय खडसेंनी असेही नमूद केले की, व्हिडिओत दिसणारी एक तरुणी धाड पडताच आपल्या पर्समधून गांजासदृश्य पदार्थ सहजपणे काढते, हे आधीपासून ठरवलेलं नव्हतं तर काय? यावरून ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय अधिक बळावतोय.
रोहिणी खडसेंचा हस्तक्षेप या प्रकरणात रोहिणी खडसे यांनी थेट पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन, या बदनामीमागील कट कारस्थानाचा तपास करण्याची मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी कोर्टात वकिलीचा ड्रेस घालून स्वत: सुनावणीदरम्यान हजर राहत जोरदार भूमिका मांडली.
देवाशप्पथ घेत जावयाचा बचाव खडसेंच्या म्हणण्यानुसार, प्रांजल खेडवलकर यांनी कोर्टात देवाशपथ घेऊन सांगितले की त्यांचा ड्रग्ज, अमली पदार्थ आणि त्या तरुणींशी काहीही संबंध नाही.
पार्टीत नेमकं काय घडलं? – 15 दिवसांपूर्वीच खेडवलकरांची यादव-पोपटाणीशी ओळख – यादव आणि पोपटाणीने दोन अनोळखी तरुणींना पार्टीत आणलं – 15 मिनिटांतच पोलिसांची अचानक धाड – व्हिडिओत तरुणी सहजपणे गांजा काढते – काही न सापडलेल्यांनाही कोठडी, यावरून शंका
राज्यात राजकीय खळबळ! या प्रकरणामुळे फक्त एकनाथ खडसेच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. खडसे गटाने यामागे राजकीय सूडभावना असल्याचा आरोप केला असून, संपूर्ण चौकशीची मागणी जोर धरत आहे.