पवना धरण, मावळ (दि. १० जुलै २०२५): मुसळधार पावसामुळे पवना धरण ७५ टक्क्यांहून अधिक भरलेले असतानाही, प्रशासनाने धरणाच्या सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम सुरू केल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. चार दिवसांपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सुरू असलेले हे काम म्हणजे दुरुस्तीच्या नावाखाली जीवघेणं बेदरकारपणाचं उदाहरण!
धोक्याची टांगती तलवार – नागरिकांमध्ये भीती:
या डागडुजीच्या कामामुळे नागरिकांमध्ये धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या, परिणामी परिसरात घबराट निर्माण झाली.
सामान्य नागरिकांमध्ये धरण फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती
सोशल मीडियावरही अफवांचा पूर उसळला
प्रशासनाला खुलासा करावा लागला
मे महिन्यातच काम पूर्ण होणार होतं – पण…
धरणाच्या देखभालीसाठी छोट्या-मोठ्या दुरुस्तीचे काम मे महिन्यातच उरकायला हवे होते, जेव्हा पावसाचे आगमन अद्याप झाले नव्हते. मात्र, अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे काम रखडले आणि ते थेट पावसाळ्यात सुरू करण्यात आले.
अधिकार्यांची जबाबदारी की दुर्लक्ष?
भरलेल्या धरणाच्या सांडव्यावर क्रेन चढवणे म्हणजे नियमांचे व सुरक्षेचे सर्रास उल्लंघन
अपघाताची शक्यता प्रबळ होती
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला
या सगळ्यावर आता वरिष्ठ पातळीवरून कारवाई केली जाईल का? – हा सगळ्यात मोठा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा संताप:
“हे धरण कोट्यवधी लोकांच्या पाण्याचा स्रोत आहे, ही केवळ बेफिकीरी नाही, तर जनतेच्या जीवाशी खेळ आहे,”
“दुरुस्ती करणे गरजेचे आहेच, पण ती वेळ आणि पद्धत यांचाही विचार व्हायला हवा,”
“जवळपास पाणी विसर्ग सुरू आहे, क्रेन जर सांडव्यावरून घसरली असती तर?” – अनेकांंचे प्रश्न प्रशासनाला अडचणीत आणत आहेत.