Home Breaking News जगातील सर्वात उंच हिंदूभूषण ‘धर्मवीर संभाजीराजे’ यांच्या पुतळ्याचे निर्माणकार्य जोरात; महेश लांडगे...

जगातील सर्वात उंच हिंदूभूषण ‘धर्मवीर संभाजीराजे’ यांच्या पुतळ्याचे निर्माणकार्य जोरात; महेश लांडगे दादांचा अभिमान!

18
0
पिंपरी-चिंचवड | छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात उंच “हिंदूभूषण पुतळा” पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून, आमदार महेश लांडगे दादांनी या प्रकल्पस्थळी भेट देऊन कलाकारांशी सविस्तर चर्चा केली.
या प्रसंगी लांडगे दादांनी सांगितले की, “हा पुतळा केवळ धातू आणि दगडाचा नव्हे, तर तो शिवप्रेम, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा अखंड प्रेरणास्त्रोत आहे. छत्रपती संभाजीराजांचे पराक्रम आजही आम्हाला ईश्वर, धर्म आणि राष्ट्रासाठी जीवन समर्पित करण्याची प्रेरणा देतात. या पुतळ्याच्या निर्मितीला माझ्या सामाजिक व राजकीय जीवनातील सुवर्णक्षण मानतो.”
या भव्य पुतळ्यामुळे देशभरातील आणि परदेशातील शिवप्रेमींसाठी पिंपरी-चिंचवड हे शिवसंभू साधना स्थळ म्हणून उदयास येणार आहे. प्रकल्पात संपूर्ण ऐतिहासिक कालखंडाचे दर्शन घडवणारे संग्रहालय, शौर्यगाथांचा व्हिडिओ प्रेक्षकगृह, भव्य उद्यान, आणि पर्यटकांसाठी सुविधांनी सज्ज असलेला परिसर उभारण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र हे युवापिढीला धर्म व देशासाठी बलिदान देण्याची शिकवण देणारे आहे. हा पुतळा फक्त एक वास्तुशिल्प नव्हे तर पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारे “हिंदवी स्वराज्याचे स्मारक” ठरणार आहे.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे!