Home Breaking News गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा भव्य...

गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा भव्य शुभारंभ

37
0
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या पर्यावरणपूरक अभियानांतर्गत १ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा भव्य शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवशी राज्यभरात ९ वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांचे उदघाटन करण्यात आले, ज्याचा प्रारंभ गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला.
मुख्यमंत्र्यांनी स्वतः झाड लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले की,“प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली, तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने हरित व समृद्ध होईल.”
या कार्यक्रमाला राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार परिणय फुके, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सरकारी कर्मचारी, शेतकरी व ग्रामस्थ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असून, राज्य शासनाच्या पर्यावरणविषयक धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी हे अभियान मोलाचे ठरणार आहे.
 मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले: “वृक्ष हे आपल्या जीवनाचा श्वास आहेत. आज आपण जी झाडं लावतो, ती उद्याच्या पिढ्यांसाठी ऑक्सिजन तयार करतात. ही केवळ मोहिम नव्हे, तर ही एक हरित क्रांती आहे!”
राज्यात २०३० पर्यंत १० कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, ही मोहिम त्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे.