पिंपरी, पुणे :- एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (SBPIM) या पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) अंतर्गत कार्यरत संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व यूजीसी कडून मिळालेली शैक्षणिक स्वायत्तता ही संपूर्ण शैक्षणिक विश्वासाठी एक अभिमानाची बाब ठरली आहे. या उल्लेखनीय यशामुळे पीसीईटीच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२५०० हून अधिक विद्यार्थ्यांना एमबीए पदवी | ८०% पीएचडी प्राध्यापक
२००९ पासून कार्यरत असलेल्या SBPIM ने अल्पावधीतच व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. देशभरातील विविध राज्यांमधून येथे येणारे विद्यार्थी केवळ पदवी नाही तर व्यवहारक्षमतेसह सामाजिक जबाबदारीने सज्ज नेतृत्व म्हणून घडत आहेत.
८०% प्राध्यापक पीएचडी धारक असून, संस्थेचे संशोधन आणि अध्यापन क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. संस्थेच्या पीएचडी केंद्रातून आतापर्यंत ३८ विद्यार्थ्यांना पदवी, तर ५५ विद्यार्थी सध्या संशोधनात कार्यरत आहेत.
ज्ञानेश्वर लांडगे: “शैक्षणिक स्वायत्तता – एक आत्मविश्वासाचा टप्पा”
PCET चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले की, SBPIM ला मिळालेली शैक्षणिक स्वायत्तता म्हणजे संस्थेच्या गुणवत्ता, नैतिकता आणि परिणामकारक व्यवस्थापन शिक्षणाचा प्रगटीकरण आहे. ३३ वर्षांच्या वाटचालीत हा मोठा टप्पा आहे आणि यातून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीत वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा | “NAAC A+” आणि “NBA” मान्यता
संस्थेला NAAC ‘A+’ दर्जा आणि NBA मान्यता प्राप्त एमबीए कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे तर जीवनोपयोगी कौशल्य, चारित्र्यनिर्मिती व उद्योग क्षेत्रासाठी सज्ज करण्यावर SBPIM भर देते. अनेक माजी विद्यार्थी आज देश-विदेशातील मोठ्या कॉर्पोरेट, स्टार्टअप आणि शासकीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत.
डॉ. किर्ती धारवाडकर: “SBPIM म्हणजे मूल्याधारित शिक्षणाचा मानबिंदू”
संस्थेच्या संचालक डॉ. किर्ती धारवाडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, SBPIM ही संस्था आगामी काळात उद्योगसज्ज, जागतिक नागरिक घडविण्याच्या दृष्टीने अधिक सक्षमपणे कार्य करेल. संस्थेचा विद्यार्थी गुणवत्तेच्या बळावर आज जागतिक पातळीवर पोहचत आहे.
मान्यवरांची उपस्थिती व शुभेच्छा
या बैठकीस पद्माताई भोसले, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, सागर बाबर, डॉ. राजेश पहुरकर यांसह विविध क्षेत्रातील उद्योगतज्ज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.