Home Breaking News आमदार सुनील शेळके यांच्या ठोस पाठपुराव्याला यश! देहूरोड कॅन्टोन्मेंट विकासाला गती; मुख्यमंत्री...

आमदार सुनील शेळके यांच्या ठोस पाठपुराव्याला यश! देहूरोड कॅन्टोन्मेंट विकासाला गती; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

25
0
मुंबई | १० जुलै २०२५ :- मुंबईतील विधानभवनात आज एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसराच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेली उच्चस्तरीय बैठक अत्यंत फलदायी ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत देहूरोड परिसरातील पायाभूत समस्या, रेड झोन अडचणी आणि पालखी मार्ग विकासावर सखोल चर्चा झाली.
🔸 कॅन्टोन्मेंटसाठी विशेष निधीची घोषणा
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कॅन्टोन्मेंट क्षेत्राकडे राज्याचं विशेष लक्ष देण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द यावेळी मिळाला. शाळा, रस्ते, पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी लवकरच विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
🔸 रेड झोन अडचणी लवकर सुटणार!
रेड झोनमुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांवर मर्यादा येत आहेत. परवानगी, बांधकाम व पायाभूत सुविधांबाबत होणाऱ्या अडचणींवर त्वरित निर्णय घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनेक कुटुंबे या समस्येमुळे अडकून पडली आहेत.

🔸 पालखी मार्ग विकासाची ग्वाही

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे आधुनिकिकरण करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारल्या जाणार असून, लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले. यामुळे वारकरी भक्तांसह स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
🔸 आमदार सुनील शेळके यांची निर्णायक भूमिका
आमदार शेळके यांनी याआधीही विविध स्तरावर देहूरोड परिसराच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले होते. आजच्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा मुद्देसूद मांडणी केली. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे हा विषय मुख्यमंत्रीस्तरावर पोहोचला आणि ठोस निर्णय झाला.
🔸 लवकरच स्वतंत्र अंमलबजावणी यंत्रणा
या विकासकामांकरिता लवकरच स्वतंत्र यंत्रणा तयार केली जाणार असून निधी वितरण व अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत.