शेंगाव, जिल्हा बुलढाणा –
शेंगाव शहरात सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज पाइपलाइन कामामुळे संपूर्ण शहरात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था झाली आहे. हे काम Eagle Infra India Ltd. या कंपनीकडून केले जात असून, पावसामुळे काम अर्धवट राहिलं आहे. त्यातच योग्य मुरूम न टाकल्यामुळे रस्ते चिखलमय व घसरडे झाले आहेत, ज्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत.
कामानंतर खोदलेले रस्ते व्यवस्थित भरले गेलेले नाहीत. कुठे माती तर कुठेचाही मुरूम न टाकता काम सोडून दिले गेले आहे. परिणामी हलक्या पावसातही संपूर्ण रस्ते चिखलानं भरून राहतात. नागरिकांनी सांगितलं की, “गाड्या घसरतात, पाय घसरतो, शाळकरी मुलं, वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.”
नगरपरिषदेचे व ठेकेदाराचे दुर्लक्ष?
शेंगाव नगरपरिषद व ठेकेदार कंपनी Eagle Infra यांच्याकडून कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. केवळ पाइप टाकून रस्ते मोकळे सोडल्यामुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
नागरिकांची प्रमुख मागणी:
-
प्रत्येक रस्त्यावर योग्य मुरूम व खडी तात्काळ टाकणे
-
चिखल हटवून वाहनचालना योग्य मार्ग उपलब्ध करून देणे
-
अपघात टाळण्यासाठी चेतावणी फलक व दिव्यांची व्यवस्था करणे
-
काम पूर्ण होईपर्यंत निगराणी ठेवण्यासाठी समिती नेमणे