Home Breaking News “लायन्स लिजंड्स लोणावळा क्लबच्या २०२५-२६ पदग्रहण सोहळ्यात सामाजिक उपक्रमांचे नवे संकल्प”

“लायन्स लिजंड्स लोणावळा क्लबच्या २०२५-२६ पदग्रहण सोहळ्यात सामाजिक उपक्रमांचे नवे संकल्प”

39
0
लोणावळा | लोणावळ्यातील प्रतिष्ठित लायन्स लिजंड्स क्लब चा पदग्रहण समारंभ दिमाखात संपन्न झाला. हॉटेल चंद्रलोक येथे झालेल्या या भव्य समारंभाचे उद्घाटन लायन एम.जे.एफ. गिरीश मालपाणी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार व क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदाधिकारी निवड – नेतृत्वाच्या नव्या दिशा
या समारंभात लायन सौ. वैशाली धनंजय साखरेकर यांची २०२५-२६ साठी अध्यक्षपदी, सौ. मीनाक्षी गायकवाड यांची सचिवपदी, तर सौ. नूतन घाणेकर यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली.
तसेच सहसचिव, उपाध्यक्ष, मार्केटिंग, सेवा, प्रशिक्षण समित्यांच्या प्रमुखांसह विविध जबाबदाऱ्या नव्या कार्यकारिणीस देण्यात आल्या. शपथविधी सोहळा हा अत्यंत उत्साहात पार पडला आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनात नव्या प्रेरणेचा संचार झाला.
नवीन सभासदांचा स्वागत आणि माहिती सत्र
या सोहळ्यात उदय पाटील, जयश्री पाटील, मनोज कदम, कृतिका कदम, अशोक अगरवाल, दिपाली अगरवाल, सुनील व संगीता पानगावकर यांचा नवीन सभासद म्हणून शपथविधी घेण्यात आला. लायन डॉ. हेमंत अगरवाल यांनी क्लबची माहिती, नियमावली, जबाबदाऱ्या यांचे मार्गदर्शन करत त्यांना क्लबमधील सहभागासाठी प्रेरित केले.
लायन्स एक्सलन्सी पुरस्कार वितरण
प्रत्येक वर्षी दिला जाणारा लायन्स एक्सलन्सी अवॉर्ड यंदा तीन संस्थांना जाहीर करण्यात आला:
विद्याप्रसारिणी सभा – १०१ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक कार्याबद्दल
वसंत व्याख्यानमाला समिती – २३ वर्षांपासून सतत सामाजिक प्रबोधन
सोमनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, नांगरगाव – ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक योगदान
या संस्थांच्या प्रतिनिधींना सन्मानचिन्ह व सरस्वती फोटोफ्रेम देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शन, उद्घोषणा व सामाजिक संकल्प
लायन गिरीश मालपाणी यांनी आपल्या स्फूर्तिदायी भाषणात एम.एस. धोनी च्या नेतृत्व गुणांचा आदर्श देत लायन सदस्यांना सेवा, सहकार्य आणि संकल्पाचे मूल्य पटवून दिले.
नवीन अध्यक्षा सौ. वैशाली साखरेकर यांनी आपल्या कार्यकाळात पुढील उपक्रमांची घोषणा केली:
वाड्या-वस्त्यांवरील मुलांसाठी शाळा
पर्यटक व रहिवाशांसाठी पाणपोई
टॉयलेट ब्लॉक व कम्युनिटी हॉल
लक्ष्मी आय. इन्स्टिट्यूट च्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी व ऑपरेशन कॅम्प
सहभाग, संचालन आणि आभार
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. उमा मेहता आणि सौ. प्रतिभा दरेकर यांनी अत्यंत आत्मीयतेने केले.
आभार प्रदर्शन लायन रमेश लूनावत यांनी केले.
कार्यक्रमात विविध सदस्यांनी गतवर्षीच्या कार्याचा आढावा, ध्वजवंदना, जमाखर्च सादरीकरण, परिचय सत्र आणि सेवाकार्याचा आढावा सादर केला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.