Home Breaking News राष्ट्रपती भवनात कैवल्यधामचा सन्मान! सुबोध तिवारी यांची राष्ट्रपती व माजी राष्ट्रपतींना सदिच्छा...

राष्ट्रपती भवनात कैवल्यधामचा सन्मान! सुबोध तिवारी यांची राष्ट्रपती व माजी राष्ट्रपतींना सदिच्छा भेट

75
0
नवी दिल्ली | लोणावळा :- जागतिक स्तरावर योग आणि अध्यात्मासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुबोध तिवारी यांनी भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची नुकतीच राष्ट्रपती भवनात सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींना “कैवल्यधाम कॉफी टेबल बुक” सप्रेम भेट देत सन्मानित केले.
योगसंस्कृतीचा गौरव
या भेटीदरम्यान भारतीय योग परंपरेचे जागतिक महत्त्व, आरोग्यवर्धनातील योगाचे योगदान यावर चर्चा झाली. राष्ट्रपतींनी कैवल्यधामच्या योग कार्याचे आणि या पुस्तकाचे मनापासून कौतुक केले. त्यांनी पुस्तकाच्या सौंदर्य, माहिती आणि प्रस्तुतीकरणाबद्दल विशेष प्रशंसा व्यक्त केली.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही सदिच्छा भेट
या भेटीचा आनंद द्विगुणित करणारी गोष्ट म्हणजे, श्री सुबोध तिवारी यांनी भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली आणि त्यांनाही कैवल्यधाम कॉफी टेबल बुक सप्रेम भेट दिली. त्यांनीही कैवल्यधाम संस्थेच्या योग आणि अध्यात्म कार्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले.
कैवल्यधामच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
श्री तिवारी यांनी या दोन्ही भेटींना “अत्यंत संस्मरणीय आणि सन्मानाचा क्षण” असे संबोधले. कैवल्यधामचा समृद्ध वारसा, योगसाधनेची परंपरा आणि आंतरराष्ट्रीय योग क्षेत्रात योगदान यावर या भेटीत सखोल चर्चा झाली.
कैवल्यधाम कॉफी टेबल बुक — योगप्रेमींसाठी अनमोल ठेवा
या विशेष पुस्तकात कैवल्यधाम संस्थेचा इतिहास, योगाभ्यासाचे विविध पैलू, शास्त्रीय संशोधन, संत परंपरा यांचा समावेश असून, हे पुस्तक एक दृश्य आणि आध्यात्मिक सौंदर्याचा संगम ठरतो.
सुबोध तिवारी यांची प्रतिक्रिया
“राष्ट्रपती आणि माजी राष्ट्रपती यांना कैवल्यधाम कॉफी टेबल बुक सादर करताना मला अभिमान वाटतो आहे. योगाची अमूल्य परंपरा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न अशा प्रसंगांमुळे अधिक बळकट होतो.” – सुबोध तिवारी
योगासाठी जगभरात मान्यता मिळवलेली संस्था
कैवल्यधाम ही संस्था 1924 पासून योग शिक्षण, संशोधन आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास यासाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील हजारो लोक येथे योग शिक्षणासाठी येतात.