Home Breaking News राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिलासा! पाच वर्षांत वीजदरात २६ टक्क्यांची टप्प्याटप्प्याने कपात;...

राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक दिलासा! पाच वर्षांत वीजदरात २६ टक्क्यांची टप्प्याटप्प्याने कपात; घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना मोठा फायदा

38
0
मुंबई | राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या याचिकेवर निर्णय देताना आगामी पाच वर्षांत घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने २६ टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील कोट्यवधी ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्याच वर्षी १० टक्के कपात, पुढील टप्प्यांमध्ये अजून फायदा
● पहिल्या वर्षी १० टक्के दरकपात होणार असून
● पुढील चार वर्षांत मिळून एकूण २६ टक्क्यांपर्यंत दर कमी होणार आहेत.
हा निर्णय राज्याच्या वीजक्षेत्राच्या इतिहासातील पहिलाच असा निर्णय आहे, ज्यात वाढीऐवजी कपातीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती.
घरगुती सौर ऊर्जा ग्राहकांना प्रोत्साहन आणि TOD सवलत
महावितरणच्या नव्या प्रस्तावानुसार:
✅ स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना दिवसा वीज वापरावर १०% TOD सवलत
✅ सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना विशेष प्रोत्साहन
शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज आणि सौर कृषी वाहिनी योजना 2.0
राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना साडेसात HP पर्यंत मोफत वीज दिली जात आहे.
या योजनेसाठी:
🔆 सौर कृषी वाहिनी योजना 2.0 युद्धपातळीवर सुरू
🔆 १६,००० मेगावॅट क्षमतेची योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
🔆 वीज दर फक्त ३ रुपये प्रति युनिट!
२०३० पर्यंत ८१ हजार मेगावॅट क्षमतेचा आराखडा तयार
● महावितरणने राज्यासाठी ४५,००० मेगावॅट वीज खरेदी करार केले आहेत
● त्यातील ३१,००० मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा स्रोतांमधून
● यामुळे दरवर्षी महावितरणचे ६६,००० कोटी रुपये वाचणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया “पूर्वी दरवाढीच्या याचिका होत असत, आज इतिहासात पहिल्यांदाच महावितरणने वीजदर कपात प्रस्ताव आणला. आयोगाने त्याला मंजुरी दिली. यातून घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक सर्व ग्राहकांना थेट फायदा होणार आहे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
१०० युनिटपेक्षा कमी वापर करणाऱ्या ७०% ग्राहकांना सर्वाधिक फायदा
राज्यात ७० टक्के वीज ग्राहक हे १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरतात.
त्यांना सर्वाधिक १०% दरकपात मिळणार आहे, ज्याचा थेट परिणाम मासिक खर्चावर होणार आहे. एकूण परिणाम – वीजबिलात सुसाट घट, सौर ऊर्जेला चालना, शेतकऱ्यांना दिवसा वीज, आणि पर्यावरणपूरक भविष्य