Home Breaking News मेट्रो शहरांमध्ये रिअल इस्टेटचा ब्रेक! मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात घरांच्या...

मेट्रो शहरांमध्ये रिअल इस्टेटचा ब्रेक! मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यात घरांच्या विक्रीत मोठी घसरण

35
0
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील प्रमुख शहरी भागांमध्ये २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. प्रॉपइक्विटीच्या आकडेवारीनुसार, घरांच्या विक्री आणि नवीन प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये वर्षभराच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे.
मुंबईत घरांची विक्री ३४% नी घसरून केवळ ८,००६ युनिट्सवर आली आहे, जी २०२४ मध्ये १२,११४ होती. यासोबतच नवीन प्रकल्पांची संख्या तब्बल ६१% नी घटून १२,६१० वरून फक्त ४,९४९ युनिट्सवर आली आहे.
ठाणे आणि नवी मुंबई या उपनगरांनाही या घसरणीचा मोठा फटका बसला आहे. ठाण्यातील घरांची विक्री ३४% नी घटली असून, नवीन पुरवठा ५८% नी कमी झाला आहे.
नवी मुंबईत विक्रीत १७% घट झाली असून, नवीन लाँचिंग ५६% नी कमी झालं आहे.
पुणे हे या तिमाहीतील सर्वात जास्त परिणाम झालेल्या शहरांपैकी एक ठरलं आहे. पुण्यात घरांची विक्री २७% नी घसरली आहे, तर नवीन प्रकल्पांचा पुरवठा ४०% नी घटला आहे.
दक्षिण भारताचं चित्र वेगळं
हैदराबादमध्ये घरांच्या विक्रीत २०% घट झाली असली तरी, नवीन पुरवठा मात्र १९% नी वाढला आहे. बेंगळुरूमध्ये परिस्थिती तुलनेने स्थिर असून, घरांची विक्री केवळ ६% नी घटली, तर पुरवठा १३% नी कमी झाला आहे.  या आकडेवारीमुळे रिअल इस्टेट गुंतवणूकदार, बांधकाम व्यावसायिक आणि घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंता पसरली आहे. व्याजदर, आर्थिक अनिश्चितता आणि वाढती घरांची किंमत यामुळे ही स्थिती निर्माण झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.