Home Breaking News कोकण किनारपट्टीवर हवामानाचा इशारा! २५ जूनपर्यंत समुद्रापासून दूर रहा – राज्य सरकारचा...

कोकण किनारपट्टीवर हवामानाचा इशारा! २५ जूनपर्यंत समुद्रापासून दूर रहा – राज्य सरकारचा अलर्ट

14
0
मुंबई | प्रतिनिधी :- कोकणात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, अरबी समुद्रात वाढलेले वारे आणि उंचच उंच भरतीच्या लाटा पाहता राज्य सरकारने २५ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीपासून दूर रpolहण्याचा इशारा दिला आहे. यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी NDRF, तटरक्षक दल व स्थानिक प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, 24 आणि 25 जून रोजी मुसळधार पाऊस, जोरदार वारे व 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांचे सत्र सुरू राहणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक, पर्यटकांना सूचना:
समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळा
मासेमारीसाठी समुद्रात न उतरण्याचे आवाहन
कोणत्याही आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा
शाळा-कॉलेजांना आवश्यकतेनुसार सुट्टीचा विचार
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिवांनी स्पष्टपणे सांगितले की, “कोकणात सध्या हवामान अस्थिर आहे. किनारपट्टीवर खेळणे, सेल्फी घेणे किंवा नौका सफरीसाठी जाणे अतिशय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.”
 पर्यटनावर परिणाम
गेल्या काही दिवसांतच कोकणातील गणपतिपुळे, हरिहरेश्वर, अलिबाग, आणि वेंगुर्ला येथे समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली होती. पण आता पर्यटनस्थळांवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे आणि काही ठिकाणी समुद्रकिनारे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.
 स्थानिक प्रशासन सज्ज
NDRF च्या तीन तुकड्या कोकणात तैनात करण्यात आल्या असून, जिल्हाधिकारी कार्यालयांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ढगफुटी किंवा पूरस्थितीचा इशारा असल्याने स्थानिक शाळांना पुढील दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.