अहमदाबाद | प्रतिनिधी:- अहमदाबाद विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या अपघातात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सवार होते. अपघातानंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले असून, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विमानातील क्रू मेंबर्सची यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
मैथिली पाटील – केबिन सहाय्यक (मूळच्या कोल्हापूर, महाराष्ट्र येथील)
मनीषा थापा – केबिन क्रू
मराठी महिलांचा उल्लेख: राज्यात चिंतेचे वातावरण
या यादीत विशेष लक्षवेधी बाब म्हणजे महाराष्ट्रातील श्रद्धा धवन (मुंबई) आणि मैथिली पाटील (कोल्हापूर) या दोन मराठी महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड चिंता असून, प्रशासनाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोघींविषयी अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी त्यांचा अपघातात गंभीर जखमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघाताचा तपास सुरू; पायलटचे कौशल्याने टळली मोठी आपत्ती
विमानात एकूण 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि 1 कॅनेडियन नागरिक होते. प्रथमदर्शनी माहितीवरून असे समजते की, टेकऑफदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाने आपले नियंत्रण गमावले आणि रनवेच्या कडेला झाडांवर आदळले. पायलट क्लाईव्ह कुंदर यांनी अत्यंत कौशल्याने विमान जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले.
विमानात कोण होते?
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
रुग्णालयात तातडीने दाखल
जखमी प्रवाशांना जवळील खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF), फायर ब्रिगेड, आणि सीआयएसएफ पथकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले.
संपूर्ण देशातून प्रार्थना आणि सहवेदना
या अपघाताच्या पार्श्वभूमीवर देशभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर #PrayForPassengers आणि #AhmedabadCrash या हॅशटॅगद्वारे लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.