Home Breaking News वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी कारवाई! फरार निलेश चव्हाण अखेर अटकेत – पुण्यातील...

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी कारवाई! फरार निलेश चव्हाण अखेर अटकेत – पुण्यातील न्यायालयाने दिली ३ दिवसांची पोलीस कोठडी

67
0
पुणे | ३१ मे :- वैष्णवी हगवणे प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. २१ जानेवारीपासून फरार असलेला निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली असून, पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बालक जनक हगवणे याच्या संगोपनात अडथळा निर्माण करणं, तसेच स्वाती कस्पटे यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धमकावणे, अशा गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे.

अटकपूर्व पळून जाण्याचा प्रयत्न उधळवून लावला
निलेश चव्हाण अनेक महिन्यांपासून फरार होता. पोलिसांकडून सुरु असलेल्या शोध मोहीमेमुळे अखेर तो नेपाळच्या सीमेवर सापडला. विशेष पथकाने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले आणि पुण्यात आणले. पुण्यात दाखल होताच त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
 न्यायालयात गंभीर आरोप मांडले
न्यायालयात सुनावणी दरम्यान, पोलिसांनी निलेश चव्हाण याच्याकडून काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्याच्याकडे लता हगवणे व करिष्मा हगवणे यांचे मोबाईल असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, रिव्हॉल्व्हरचा परवाना देखील पोलिसांनी रद्द केला आहे. आरोपीने कस्पटे कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावल्याचेही नमूद केले गेले.
 शस्त्र व मोबाईल जप्तीचा प्रस्ताव
पोलीस तपासादरम्यान रिव्हॉल्व्हर व संबंधित मोबाईल जप्त करणे आवश्यक असल्याने, पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मान्य करून आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपासादरम्यान अजून काही धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे.
 वैष्णवी हगवणे प्रकरणाची गंभीरता वाढली
या प्रकरणात आता आणखी गांभीर्य निर्माण झाले असून, समाजात एकच चर्चा सुरू झाली आहे – एकट्या महिलांवर होणाऱ्या अन्यायाचा आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा. निलेश चव्हाणच्या अटकेनंतर आता न्याय प्रक्रियेला वेग येण्याची अपेक्षा आहे.