Home Breaking News राज्यस्तरीय पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये सन्मान; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या...

राज्यस्तरीय पदकप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये सन्मान; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते गौरव सोहळा संपन्न

105
0

पिंपरी-चिंचवड (२ मे): महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय आणि उत्कृष्ठ सेवेसाठी निवड झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या गौरव सोहळ्यात पोलीस महासंचालक पदक आणि विशेष सेवा पदक प्राप्त केलेल्या अधिकारी-अमंलदारांचा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

उत्कृष्ट सेवेसाठी मान्यता:

उत्कृष्ट व निःस्वार्थ सेवेसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन्मानचिन्हासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वीसहून अधिक पोलीस अधिकारी आणि अमंलदारांची निवड झाली.
त्यामध्ये पुढील अधिकारी विशेषत्वाने सन्मानित झाले:

  • पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे

  • पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड

  • पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण

  • पोलीस अमंलदार विकास राठोड

  • नितीन ढोरजे

विशेष सेवा पदक – गडचिरोलीसारख्या संवेदनशील भागातील यशस्वी सेवा:

गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांपेक्षा अधिक काळ नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या खालील अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले:

  • पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी

  • पोलीस उपनिरीक्षक संदिप खलाटे

  • पोलीस उपनिरीक्षक गंगाधर ढगे

  • पोलीस उपनिरीक्षक अहमद मुल्ला

  • पोलीस उपनिरीक्षक विकास सूर्यवंशी

  • पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव

हे पदक १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने पुण्यातील पोलीस मुख्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गौरव समारंभात मान्यवरांची उपस्थिती:

सत्कार समारंभास पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे (गुन्हे), स्वप्ना गोरे (परिमंडळ १), विवेक पाटील (मुख्यालय), बापु बांगर (वाहतूक) आणि सहा पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, सतीश कसबे, सुनिल कुहाडे यांची उपस्थिती लाभली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देत सन्मानित अधिकाऱ्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचे प्रतिपादन:

“या पोलीस अधिकाऱ्यांनी कठीण परिस्थितीतही जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करत समाजाचा विश्वास जिंकला आहे. त्यांचे कार्य पोलीस दलासाठी आदर्शवत आहे.”

जनतेचा अभिमान – पोलीस दलाची प्रतिष्ठा:

या कार्यक्रमामुळे पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सार्वजनिक सन्मान झाला असून, तरुण पिढीला अशा सेवाभावी व्यक्तींपासून प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हे गौरव सन्मान केवळ पदके नसून, पोलीस दलाच्या निष्ठेची आणि सेवाभावाची पावती आहेत.