Home Breaking News “भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर अटकेत; देशद्रोहाचा खटला, पदावरून हटवले...

“भारताच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर अटकेत; देशद्रोहाचा खटला, पदावरून हटवले जाण्याची शक्यता!”

86
0

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. या कारवाईचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून मुनीर यांची लवकरच उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. त्यांची जागा जनरल शमशाद मिर्झा हे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काश्मीरविषयी भडकाऊ वक्तव्ये आणि दहशतवादी कृत्यांची मालिका

असीम मुनीर यांनी गेल्या काही महिन्यांत काश्मीरविषयी केलेली भडकाऊ भाषणं आणि भारतविरोधी वक्तव्यं यामुळे भारतात रोष होता. विशेषतः पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचं नाव चर्चेत आलं. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. याशिवाय, मुनीर हे खालील दहशतवादी घटनांचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहे:

  • जानेवारी २०२३: राजौरी येथील दहशतवादी गोळीबार

  • एप्रिल २०२३: भारतीय सैन्याच्या ताफ्यावर हल्ला

  • जून २०२४: वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला

  • ऑक्टोबर २०२४: सोनमर्ग बोगद्यात मजुरांवर दहशतवादी हल्ला

या सर्व घटनांमुळे भारतीय जनतेच्या भावना प्रचंड दुखावल्या होत्या.

 ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला , भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत पाकिस्तानच्या लष्करी स्थापत्यावर गंभीर परिणाम झाला असून शहबाज शरीफ यांच्या घराजवळ आणि असीम मुनीर यांच्या घराशेजारी स्फोट झाले.

 लष्करप्रमुख आणि कॉर्पोरेट कनेक्शन

असीम मुनीर फक्त लष्करप्रमुख नव्हते, तर त्यांचे पाकिस्तानमधील अनेक उद्योगांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी लष्कराच्या अधिकाराचा वापर करून अनेक कॉर्पोरेट व्यवहारांना पाठबळ दिल्याचा आरोप सध्या पाकिस्तानात चर्चेचा विषय आहे.
त्यामुळे त्यांच्यावर फक्त देशद्रोहच नव्हे, तर भ्रष्टाचाराचेही खटले दाखल होण्याची शक्यता आहे.

 देशद्रोहाचा खटला आणि सत्ता संघर्ष

असीम मुनीर यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी नेतृत्वात मोठा संघर्ष सुरु झाला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही दबाव वाढला असून, लष्करात फुट पडण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत.

 पुढचं पाऊल

पाकिस्तानने भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न करताच, भारतीय लष्कर आणि नौदलाने प्रचंड ताकदीनं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे आता पाकिस्तानात लष्करप्रमुख बदलण्याची वेळ आलेली आहे. नवीन लष्करप्रमुख शमशाद मिर्झा यांच्याकडे आता परिस्थिती सांभाळण्याचं मोठं आव्हान आहे.