मुंबई / पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेचा निकाल आज मंगळवार, 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. या निकालाची माहिती पुणे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या परीक्षेत राज्यभरातून लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यामुळे सर्वांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्गत ही परीक्षा पार पडली.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे: विद्यार्थी आणि पालक खालील 9 संकेतस्थळांवर निकाल पाहू शकतील:
निकालाच्या प्रिंट आउटची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. शाळांना त्यांच्या शाळेच्या लॉगिनद्वारे https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती मिळेल.
गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्जाची प्रक्रिया:
गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज 14 मे ते 28 मे 2025 दरम्यान ऑनलाईन करता येणार. अर्जासाठी मंडळाच्या https://mahahsscboard.in संकेतस्थळावर आवश्यक सूचना, अटी व शुल्क तपशील दिले आहेत. शुल्क भरण्यासाठी Debit Card, Credit Card, UPI, किंवा Net Banking चा वापर करता येईल.
पुनर्मूल्यांकनासाठी विशेष सूचना:
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याआधी छायाप्रती घेणे अनिवार्य आहे. छायाप्रती मिळाल्याच्या दिवसापासून 5 कार्यालयीन दिवसांत अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी विहित नमुन्यात अर्ज व शुल्कासह संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
श्रेणी/गुणसुधार योजना आणि पुरवणी परीक्षा:
दहावीत सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तीन वेळा श्रेणी/गुण सुधारण्याची संधी (Class Improvement Scheme) उपलब्ध राहील. जून-जुलै 2025 मधील पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया 15 मेपासून सुरू होणार आहे. त्याबाबतचे स्वतंत्र परिपत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
निकालादिवशी पालक व विद्यार्थ्यांना सुचना:
एकाच वेळी अनेक जण वेबसाईटवर लॉगिन केल्याने संकेतस्थळं स्लो होऊ शकतात. संयम बाळगावा. निकालाच्या प्रिंट आउटवरून पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक उपयोग करता येईल. मूळ गुणपत्रक काही दिवसांत संबंधित शाळांमार्फत मिळेल.