नवी दिल्ली | दिनांक – ७ मे २०२५ :- पहलगाम येथे 24 April रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवत भारताने पाकिस्तानातील नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये भारतीय लष्कराने प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत ‘एलएमएस’ (Loitering Munitions Systems) ड्रोन आणि हवाई दलाच्या मिसाईल्सद्वारे तळ उद्ध्वस्त केले आहेत.
ड्रोनस्ट्राईकसह मिसाईल्सचा धडाका – अत्याधुनिक युद्धनीतीचा अवलंब
भारताच्या या कारवाईत विशेषत: ‘एलएमएस ड्रोन’चा वापर केला गेला, ज्यामुळे लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने हल्ले करता आले. हे ड्रोन लक्ष्याच्या परिसरात घिरट्या घालून योग्य क्षणाची वाट पाहतात आणि मग तळावर अचूक प्रहार करतात.
🔸 संपूर्ण कारवाई २ तासांत पूर्ण
🔸 मध्यरात्री दीडपासून पहाटे चार वाजेपर्यंत हल्ल्यांची मालिका
🔸 सर्व ९ ठिकाणी एकाचवेळी प्रहार, २४ हल्ले
भारतीय हवाई दलाने त्याचबरोबर प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली वापरून जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबाचे ठिकाणे भस्मसात केली आहेत. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई “सर्जिकल स्ट्राइक २.० पेक्षाही अधिक प्रभावी आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत” होती.
भारताची कारवाई आणि जागतिक प्रतिक्रिया
भारताच्या या तडाखेबंद कारवाईनंतर विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारताची ‘नो डॉलर्स टू टेरर’ आणि ‘नो टॉलरन्स टू टेरर’ ही स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी म्हटले, loklok“जगाला आता एकत्र येऊन आतंकवादाला संपूर्णपणे नष्ट करावे लागेल. भारत शांततेचा पाठीराखा आहे, पण जर कोणी आमच्यावर हल्ला केला, तर आम्ही त्याला १० पट प्रत्युत्तर देऊ.”
राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटींचा भारतीय लष्कराला सलाम
-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे पोस्टर त्यांच्या एक्स (Twitter) खात्यावर शेअर करत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले.
-
महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा, अभिनेता रितेश देशमुख, तसेच अनेक सेलिब्रिटी, उद्योजक आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी लष्कराच्या धाडसाचे स्वागत केले आहे.