Home Breaking News शहरी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्राज...

शहरी विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्राज अर्बन लॅण्डस्केप’ पोर्टलचे भव्य उद्घाटन

85
0

मुंबई – महाराष्ट्रातील शहरी विकासाला नवे वळण देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्राज अर्बन लॅण्डस्केप: टीडीआर-एक्स्चेंज – ए युनिफाईड डिजिटल प्लॅटफॉर्म फॉर ट्रान्सपरन्ट टीडीआर ट्रान्झॅक्शन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पोर्टलमुळे महाराष्ट्रातील शहरी भागांतील विकास अधिक पारदर्शक, गतिमान व नियोजनबद्ध होणार आहे.

या उद्घाटन सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शहरे विकासात काम करणारे तज्ज्ञ, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की, “टीडीआर म्हणजे ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट्स – याच्या माध्यमातून मुंबईसह संपूर्ण राज्यात शहरी भागातील विकास कामांना अधिक गती मिळणार आहे. या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे टीडीआर खरेदी-विक्री व्यवहार पारदर्शक पद्धतीने होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले की, “टीडीआर एक्स्चेंज पोर्टलमुळे बिल्डर, डेव्हलपर, स्थानिक प्रशासन व सामान्य नागरिक यांना एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होणार असून सर्व व्यवहार एका क्लिकवर शक्य होतील.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “डिजिटायझेशन हे काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमुळे महाराष्ट्र देशभरात शहरी विकासासाठी मॉडेल ठरेल.”

या पोर्टलमुळे बिल्डर व डेव्हलपर्ससाठी मोठी सोय झाली असून, टीडीआर व्यवहारामध्ये गुंतागुंतीच्या प्रक्रिया कमी होतील. यामुळे शहरी विकासासाठी गरजेचा वेळ वाचणार असून, नियोजनबद्ध आणि शाश्वत शहरनिर्मितीला चालना मिळणार आहे.