Home Breaking News भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 300 महिलांचा सहभाग; जळगावात महिला दिनानिमित्त आरोग्याचा...

भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात 300 महिलांचा सहभाग; जळगावात महिला दिनानिमित्त आरोग्याचा जागर

70
0

जळगाव : रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव व एस.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत महा आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्याची काळजी घेत विशेषतः महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 7 मार्च 2025 रोजी जळगाव येथील मायादेवी नगरमधील रोटरी हॉल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिरात बी.पी., शुगर, हृदयरोग, आयुर्वेद, मेंदू-मणका तसेच कॅन्सर तपासणीसह विविध आरोग्य विषयक चाचण्या करण्यात आल्या. या उपक्रमामुळे महिलांना आरोग्याविषयी जागरूक करण्याबरोबरच त्यांचे नियमित आरोग्य परीक्षण करून त्यांना आवश्यक उपचार आणि मार्गदर्शन देण्याचा महत्वपूर्ण उद्देश साध्य झाला.

या शिबिराचा 300 महिलांनी लाभ घेतला. महिलांनी आपल्या आरोग्याविषयी अधिक जागरूक होऊन तपासणीसाठी उपस्थित राहिल्याने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जळगाव युनिटचे अध्यक्ष मा.श्री.विशनजी मिलवाणी, शिबीर प्रमुख व रेड स्वस्तिक सोसायटीचे राष्ट्रीय समन्वयक मा.श्री.अशोकजी शिंदे, तसेच डॉ. गणेशजी पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले. विशेषत: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त श्री. जे.बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर प्रभावीपणे पार पडले.

यासह या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रेड स्वस्तिक सोसायटी, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था आणि नाशिक येथील एस.सी.जी. मानवता कॅन्सर सेंटरचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि डॉक्टर मंडळींनी मोलाची भूमिका बजावली.

तसेच, जळगाव जिल्हा स्काऊट व गाईड फेलोशिप युनिटचे उपाध्यक्ष प्रा. यशवंत सैंदाणे, सचिव श्री. सुनील पालवे, प्रा. विनोद कोचुरे, श्री. नंदूजी रायगडे, श्री. दिपक पाटील, श्री. दिलीप गवळी यांचेही या उपक्रमाच्या यशस्वीतेत मोलाचे योगदान लाभले.

महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्यविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराचे परिसरातील नागरिक आणि महिलांनी भरभरून स्वागत केले. महिलांनी आरोग्य तपासणीत भाग घेऊन त्यांच्या आरोग्याची तपासणी केली आणि आवश्यक सल्ला घेण्यास पुढाकार घेतला.