महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या ‘पीएम गतिशक्ती’ (PM Gati Shakti) अंतर्गत बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG) च्या ८९व्या बैठकीत घेण्यात आला.
या विस्तार प्रकल्पाची महत्त्वाची वैशिष्ट्ये :
✅ ३२.४६० किमी लांबीचा ब्राउनफिल्ड प्रकल्प हा मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ✅ या नव्या मार्गामुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत या स्थानकांवरील प्रवासी आणि मालवाहतुकीच्या अडचणी कमी होणार आहेत. ✅ मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना सततच्या विलंबाचा सामना करावा लागत होता. हा विस्तार प्रकल्प मार्गातील वाहतुकीचा बोजा कमी करेल आणि गाड्यांचे वेळापत्रक अधिक नियमित होईल. ✅ कल्याण ते कर्जत दरम्यान वाहतुकीच्या वाढत्या भारामुळे अनेकदा गाड्या उशिरा धावतात. नव्या मार्गामुळे हे अडथळे दूर होऊन अधिक गतिमान सेवा मिळणार आहे. ✅ व्यापारी वर्गाला मालवाहतुकीसाठी अधिक जलद आणि सोयीस्कर सेवा मिळणार असून उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होईल.
स्थानिक आर्थिक विकासाला मिळणार गती
या प्रकल्पामुळे स्थानिक परिसरातील नागरीकांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असून रेल्वे स्थानकांजवळील परिसराचा विकास वेगाने होणार आहे. स्थानिक व्यवसाय, हॉटेल्स आणि लॉजिस्टिक सेवा यांनाही मोठी चालना मिळेल.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार!
हा निर्णय मुंबई आणि पुणे परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रवासात अडथळे निर्माण होत होते. हा विस्तार प्रकल्प प्रवाशांच्या अडचणी दूर करणार असून रेल्वे सेवा अधिक वेगवान, सुरक्षित आणि कार्यक्षम होईल.