पिंपरी-चिंचवड : जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
युवक-युवतींची आयकॉन असलेल्या प्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रुती उबाळे यांना ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. आशाताई पाचपांडे यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आशाताई पाचपांडे म्हणाल्या की, “महिला दिनानिमित्त पत्रकारांनी केलेला सन्मान हा महिलांना कार्य करण्यासाठी नवी ऊर्जा देणारा असतो.”
या सोहळ्यात सिने अभिनेत्री पूजा पवार साळुंखे, कायनेटिक ग्रीनच्या संचालिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. विशेषतः सारिताताई साने, रुपलिताई अल्हाट, प्राजक्ता गोरडे टाकळकर, निकिता कांबळे, सुप्रिया साठे, अनिताताई काटे यांच्यासह 10 बचत गटांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषद उपाध्यक्ष गणेश मोकाशी होते. पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुळे, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय सोनवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या उल्लेखनीय कार्याची स्तुती करत सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन विनय सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषदेचे सागर सूर्यवंशी, राम शेडगे, अशोक कोकणे, किशोरअण्णा लष्करे, संभाजी बरबोले, मारुती बानेवार, योगेश वडमारे, भाऊसाहेब निकम, देविदास लिमजे, माऊली भोसले, राहुल जाधव, नरेशजी, प्रसाद वडघुळे, सिद्धांत चौधरी, रमेश साठे, चिराग फुलसुंदर, प्रकाश जमाले, श्रद्धा प्रभुणे, संतोष गोतावळे, महावीर जाधव, पराग डिंगणकर, सचिन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
याशिवाय जय माता दी ग्रुपच्या एमडी स्वाती मोहिते व मनीष मोहिते, हायकोर्ट वकील ऍडव्होकेट सुप्रिया गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते नढे अण्णा यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दिलीप सोनिगरा मुख्य प्रायोजक तर कायनेटिक ग्रीन व जय माता दी ग्रुप हे सहप्रायोजक होते. ASM कॉलेज, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.