Home Breaking News क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या...

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन.

52
0

पिंपरी, दि. १५ मार्च २०२५:- पिंपरी चिंचवड महपालिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 त्याअनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन सोमवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामधील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.

तरी या बैठकीस विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.