Home Breaking News अरिजित सिंगच्या कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल: पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती

अरिजित सिंगच्या कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल: पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती

96
0

पुणे : लोकप्रिय गायक अरिजित सिंग याचा बहुप्रतिक्षित लाईव्ह कॉन्सर्ट गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियम येथे रविवारी (दि. 16 मार्च) होणार आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी येणाऱ्या हजारो प्रेक्षकांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी देहूरोड परिसरातील वाहतुकीत विशेष बदल करण्यात आला आहे. या बदलांची अंमलबजावणी दुपारी 1 ते रात्री 12 वाजेपर्यंत केली जाणार असल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.

वाहतुकीसाठी विशेष नियोजन

➡️ मुंबईकडून येणारी वाहने:

  • मुंबईहून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांना देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळून मामुर्डी गाव मार्गे स्टेडियमकडे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • यासाठी मुकाई चौकात यूटर्न घेऊन, सिंबायोसिस कॉलेज मार्गे आणि शितलादेवी मंदिर मार्गे गहुंजे स्टेडियमला पोहोचता येणार आहे.

➡️ पुणेहून येणारी वाहने:

  • पुण्याहून येणाऱ्या वाहनांना किवळे ब्रिज मार्गे द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • निगडी हँगिंग ब्रिज कडून येणाऱ्या वाहनांना कृष्णा चौक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

➡️ जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने:

  • या वाहनांना सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक, बेंगळुरू हायवे मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

  • तसेच मामुर्डी जकात नाका येथील अंडरपास मार्गे वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

वाहनांवरील निर्बंध

  • मामुर्डी गावातील रूहिझ बिर्याणी ते मासुळकर फार्म बाजूकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असेल.

  • मरीमाता चौक, किवळे नाला येथून मासुळकर फार्म बाजूकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश दिला जाणार नाही.

अत्यावश्यक सेवा वाहनांची व्यवस्था

  • गहुंजे पूल ते Y जंक्शन मार्गे स्टेडियमकडे अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश खुला असेल.

वाहनचालकांसाठी महत्त्वाचे आवाहन

वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना वाहन पार्किंगसाठी निश्चित स्थळीच पार्किंग करण्याचे, तसेच वाहतूक मार्गदर्शक फलकांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 अरिजित सिंग यांच्या सुमधुर आवाजाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांनी वाहतुकीच्या नियमानुसार प्रवास करावा आणि कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा.