📍 पुणे :- महाराष्ट्र पोलीस दलात अनेक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी आहेत. सत्य साई कार्तिक हे नाव सध्या अशाच अधिकाऱ्यांमध्ये अग्रस्थानी आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या IPS सत्य साई कार्तिक यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेने आणि कणखर भूमिकेने गुन्हेगारी जगताला हादरवून सोडले आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष कारवायांमुळे ते गुन्हेगारांसाठी धडकी भरवणारे अधिकारी ठरले आहेत.
🔹 महाराष्ट्र पोलिसांचे कर्तव्यनिष्ठ अधिकारी – IPS सत्य साई कार्तिक!
IPS सत्य साई कार्तिक यांचे कार्य फक्त पुणे ग्रामीण पुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या धडाकेबाज कारवाया, कणखर नेतृत्व आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील कठोर भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असलेल्या या कर्तव्यदक्ष IPS अधिकाऱ्यांचे समाजात मोठे योगदान आहे.
🔴 लोणावळ्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा नायनाट
▪ लोणावळा आणि परिसर गुन्हेगारी प्रवृत्तींनी पोखरलेला होता.
▪ रेव्ह पार्ट्या, हुक्का पार्लर, अवैध गुटखा विक्री, मटका अड्डे, गांजा आणि दारू तस्करी हे अवैध व्यवसाय खुलेआम सुरू होते.
▪ IPS कार्तिक यांनी विशेष मोहीम राबवत अशा धंद्यांवर कठोर कारवाई केली.
▪ त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली अनेक बेकायदेशीर अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर आरोपींना तुरुंगात डांबण्यात आले.
🛑 अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका
▪ IPS कार्तिक यांनी अवैध धंदेवाल्यांच्या कर्दनकाळ बनत, लोणावळ्यात स्वच्छता मोहीम उघडली आहे.
▪ अनेक वर्षे बिनधास्त सुरू असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तींना त्यांनी रोखले आणि कठोर कायदेशीर कारवाई केली.
▪ गुटखा माफिया, ड्रग्स तस्कर आणि दारू विक्रेत्यांचे जाळे त्यांनी उद्ध्वस्त केले.
▪ यामुळे, लोणावळा आणि परिसरात कायदा-सुव्यवस्थेत मोठा बदल घडून आला.
❗”संकल्प – नशामुक्त समाज” अभियानाची प्रभावी अंमलबजावणी
▪ IPS कार्तिक यांनी “संकल्प – नशामुक्त समाज” ही मोहीम प्रभावीपणे राबवली.
▪ तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडू नये, यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
▪ विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये “नशामुक्ती जनजागृती” मोहीम राबवली जात आहे.
▪ गांजा, ड्रग्स आणि अन्य मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून कारवाई केली जात आहे.