चला शेगांवासी जाऊ | गजानन देवा पाहू |
डोळे निवतील कान | मना तेथे समाधान ||
संता महंता होतील भेटी | आनंदे नाचे संतनगरी |
हे भक्तांचे माहेर | सर्व सुखाचे भांडार |
हे भक्तांचे माहेर सर्व सुखांचे भांडार असलेल्या संतनगरी शेगावात श्रींचा १४७ वा प्रगट दिन महोत्सव गण गण गणात बोते, जय गजानन श्री गजानन, श्री गजानन अवलिया अवतरले जगताराया …
अनु रेणू मध्ये ब्रह्म व्यापीले |
लय उत्पत्ती समान ||
माद्य सप्तमी पुण्य दिवशी |
प्रगटले योगी महान ||
अशा या संतनगरीचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराजांचा १४७ वा प्रकट दिन सोहळा माद्य कृ ७ गुरुवार २० फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात होत आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण शेगाव नगरी सज्ज झाली आहे. राज्यभरातून श्रींच्या प्रगट दिन उत्सवासाठी आज बुधवार १९ फेब्रुवारी च्या संध्याकाळपर्यंत ८४० च्या वर भजनी दिंड्या दाखल झाल्या होत्या व भजनी दिंड्या येण्याचा ओद्य संतनगरीत चालू आहे .
योगीराज संत श्री गजानन महाराजांचा १४७ वा प्रगट दिन उत्सव सोहळा गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री महारुद्र स्वाहाकार यागाचे पूजन करून श्रींचा प्रगट दिन उत्सवाला प्रारंभ झाला. दरम्यान भक्तिमय व मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमानुसार गुरुवार २० फेब्रुवारी रोजी श्रींचा प्रगट दिन उत्सव पार पडत आहे. त्या अनुषंगाने श्रींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज मंदिरामध्ये काकडा ,भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ व रात्री महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. या उत्सवात महारुद्र स्वाहाकार यागास माद्य कृ १ गुरुवार १३फेब्रुवारी ला आरंभ होऊन आज माद्य कृ ७ गुरुवार २० फेब्रुवारी रोजी श्रींच्या प्रगटदिनी सकाळी १० वाजता यज्ञ यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. त्यानंतर सकाळी १० ते १२ या दरम्यान ह भ प श्री भरत बुवा पाटील म्हैसवाडी यांचे शेगावी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त कीर्तन होईल. तर नंतर दुपारी ४ वाजता श्रींच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व , रथ, मेण्यासह, परिक्रमा करिता श्रींच्या मंदिरातून मार्गस्थ होईल.
श्रींच्या पालखी चा परिक्रमा मार्ग
श्री प्रगटदिन उत्सवानिमित्य दि.२०/०२/२०२५ रोजी श्रींची पालखी परिक्रमा अश्व व भजनी दिंडीसह दुपारी ४.०० वाजता श्री मंदिर परिसरातून निघेल. श्री पालखी परिक्रमा मंदिर परिसरातील सेवाधारी प्रसादालय जवळील उत्तर द्वारातून, महात्मा फुले बँके समोरुन, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले चौकातून, श्री संत सावता माळी चौक, श्री हरिहर मंदिर जवळून, भिम नगर (तिन पुतळा परिसर), शाळा नं. २ (सावित्रीबाई फुले चौक), फुले नगरातून, श्री प्रगटस्थळ जवळून, सितामाता मंदिर, लायब्ररी जवळून (श्री गर्गाचार्य मंदिरा समोरुन), पश्चिम गेटमधून श्री मंदिर परिसरामध्ये सायं. ६.०० वाजताचे आसपास परत येईल.
**श्रींच्या प्रगट दिन उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
सर्वत्र मंदिर परिसरात केळीचे खांबाचे खुट व आंब्याच्या पानाचे तोरण लावण्यात येऊन भक्तीमय वातावरण असून श्रींच्या नाम घोषात भक्त तल्लीन होत. श्रींच्या प्रगट दिन उत्सवात सहभागी होत आहेत.
श्री मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होईल हे लक्षात घेता व काही अप्रिय घटना घडू नये याची दक्षता म्हणून वन-वे( एकेरी मार्ग )करण्यात आला आहे. त्यात श्रींची समाधी दर्शन व्यवस्था, श्री मुखदर्शन व्यवस्था, श्री महाप्रसाद, श्री पारायण कक्ष मंडप, इत्यादी व्यवस्था केलेली आहे. **