चिखली-कुदळवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या (भा.ज.पा.) सदस्यता नोंदणीस भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. भाजयुमो शहर सरचिटणीस दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली या संघटन पर्वात दोन हजार सदस्य नोंदणी करण्यात यश आले. यामध्ये युवावर्ग, महिलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा देखील सहभाग होता. या महत्त्वाच्या कार्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनेश यादव यांना पत्र पाठवून त्यांचे विशेष कौतुक केले असून, कार्याची दखल घेतली आहे.
पत्राद्वारे बावनकुळे यांनी चिखली-कुदळवाडी परिसरातील कार्याची प्रशंसा केली आणि सदस्य नोंदणीच्या यशस्वी कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला. यासोबतच भाजपच्या संघटन पर्वात या योगदानामुळे भाजपची संघटना अधिक बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची मेहनत, भाजपला असलेली निष्ठा आणि आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प यशस्वी झाला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले.
दिनेश यादव यांनीही यावेळी सांगितले की, ‘पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे राष्ट्र प्रथम आणि नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हा संकल्प उराशी बाळगला. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सदस्यता नोंदणी मोहीम सफल झाली. यामध्ये मोठ्या संख्येने युवावर्ग, महिलांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड योगदान मिळाले आहे. यापुढेही हे कार्य असेच सुरू राहील.’
पक्षाच्या कार्यकारिणीच्या उद्दिष्टांनुसार, चिखली-कुदळवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. भाजपची कार्यसंघटना वाढविणे, अधिक सदस्य जोडणे आणि पक्षाची ताकद वाढविणे यासोबतच एकता आणि संघटनांची रुंद कक्षा यावरही लक्ष केंद्रित केले आहे.