Home Breaking News सुधीरभाऊ मुनगंटीवार: चंद्रपूर जिल्ह्यातील किंगमेकर, महायुतीसाठी निर्णायक विजय !!!

सुधीरभाऊ मुनगंटीवार: चंद्रपूर जिल्ह्यातील किंगमेकर, महायुतीसाठी निर्णायक विजय !!!

59
0

या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात महायुतीने ६ पैकी ५ जागा जिंकल्या, ज्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला स्थानिक विकास कामे आणि मतदारांवरील प्रभावाच्या जोरावर विजय मिळवता आला. या निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार स्वतः बल्लारपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांचा प्रभाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विकासकामांमुळे महायुतीला मोठ्या प्रमाणावर मतदारांचा पाठिंबा मिळाला आहे

या विजयाने मुनगंटीवार यांना जिल्ह्यात “किंगमेकर” म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जिल्ह्यातील राजकीय समीकरण आपल्या बाजूने वळवले​

चंद्रपूर जिल्ह्यातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सर्व भाजपा विजयी उमेदवारांची यादी (सर्व मतदारसंघ):

  1. राजुरा मतदारसंघ: देवराव भोंगळे (भाजप)
  2. चंद्रपूर मतदारसंघ: किशोर जोरगेवार (भाजप)
  3. बल्लारपूर मतदारसंघ: सुधीर मुनगंटीवार (भाजप)
  4. वरोरा मतदारसंघ: संजय देवतळे (भाजप)
  5. चिमूर मतदारसंघ: बंटी भांगडिया (भाजप)