खामगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आकाश फुंडकर यांनी 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा सलग विजय मिळवत हॅटट्रिक साधली आहे. त्यांच्या या विजयामुळे खामगाव मतदारसंघात भाजपचा गड अधिक बळकट झाला आहे.
आकाश फुंडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीपकुमार सानंदा यांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे देविदास हिवराळे तिसऱ्या स्थानावर राहिले.
मतदारसंघातील विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन या घटकांनी फुंडकर यांना मोठ्या प्रमाणावर जनाधार मिळवून दिला. त्यांच्या विजयामुळे भाजपच्या महायुतीचे बळ राज्याच्या राजकारणात आणखी वाढले आहे