Home निवडणूक २०२४ शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; रावेरमधून श्रीराम पाटील, तर...

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; रावेरमधून श्रीराम पाटील, तर साताऱ्यातून…

157
0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रत्येक पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर केली जाते आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज भाजपाकडूनही साताऱ्यातील उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी ३० मार्च आणि ४ एप्रिल रोजी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानुसार वर्धेतून अमर काळे
दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, बीडमधून बजरंग बारणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here